Municipal Elections Update : महापालिका निवडणुकांबाबत मोठी अपडेट ; आता मुहूर्त दिवाळीत नाही, तर थेट पुढील वर्षात?

Reason Behind Maharashtra Municipal Election Delay – महापालिका निवडणूक केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकही सक्रिय झाले आहेत. नागरिकांशी संपर्क वाढवला जात आहे. नव्याने प्रभाग रचना करण्यासाठी आखण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार दिवाळीच्या आसपास ही निवडणूक होईल असा अंदाज वर्तविला जात होता.

मात्र अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी यापूर्वी दिलेल्या तारखेत राज्य शासनाने बदल केला आहे. यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसा शासनादेश काढला आहे. हे बघता आता नव्या वर्षातच महापालिका निवडणुकीची मुहूर्त निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नागपूर महापालिकेत सुमारे साडेतीन वर्षांपासून प्रशासक आहे. अशीच परिस्थिती राज्यतील सर्वच महापालिकेची आहे. ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यामुळे सर्वच प्रक्रिया खोळंबली होती. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर अंतिम निर्णय अद्याप दिला नसला तरी महापालिकेची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहे. हा आदेश धडकताच नव्याने प्रगाभ रचनेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

चार सदस्यांचा प्रभागाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नोटीफिकेशन काढण्यात आले होते. त्यानुसार ११ जूनपासून प्रगणक गटाची मांडणी, गुगल मॅपवर नकाशे तयार करणे, ३१ जुलैला प्रभाग रचनेचा मुसदा तयार करणे, २२ ऑगस्ट रोजी प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवणे, ९ सप्टेंबरला प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास सादर करणे, त्यानंतर २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभाग रचनेच्या अधिसूचनेस प्रसिद्ध असा कार्यक्रम आखून दिला होता.

मात्र आता अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी ३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर अशी जवळपास एक महिन्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. जुन्या कार्यक्रमावरून दिवाळीत निवडणुकीचे फटाके फुटतील असा अंदाज घेऊन सर्वच पक्षाने आपआपली तयारी सुरू केलेली.

भाजपने ‘मोदी सरकार ग्यारह साल बेमिसाल’ या माध्यमातून महापालिका निवडणुकीची तयारी चालवली आहे. चारशे सभा व बैठका घेण्याचे नियोजन केले आहे. पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

नागपूर महापालिकेने अचानक रस्ते झाडून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. असे असले तरी डिसेंबर महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन बघता निवडणुकीचा मुहूर्त नव्या वर्षात निघेल असा तर्क लावला जात आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment