भारत सरकारने ग्रामीण आणि शहरी भागांतील economically weaker sections (EWS) किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी प्रधानमंत्री घरकुल योजना (PMAY – Pradhan Mantri Awas Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देते, ज्यामुळे गरजू लोकांना स्वतःचं पक्कं घर मिळण्यास मदत होते.
योजनेचा उद्देश
गरीब, बेघर किंवा अपुर्या घरात राहणाऱ्या नागरिकांना पक्कं घर देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
अर्ज कसा करायचा?
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर पुढीलप्रमाणे प्रक्रिया करा:
- ऑनलाइन फॉर्म भरणे – सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपल्या वैयक्तिक माहितीचा एक सर्वे भरावा लागतो.
- माहिती भरताना विचारल्या जाणाऱ्या गोष्टी:
- अर्जदाराचं पूर्ण नाव
- घरात राहणाऱ्यांची संख्या
- वार्षिक/मासिक उत्पन्न
- सध्या राहत असलेला पत्ता
- जातीचा तपशील (SC/ST/इतर)
माझं नाव यादीत आहे का?
ही योजनेत सहभागी झाल्यानंतर अनेकांना वाटतं की आपलं नाव यादीत आहे का, हे कसं कळणार? आता ही माहिती तुम्ही ऑनलाइन सहज तपासू शकता.
यादी पाहण्याची पद्धत
आवश्यक गोष्टी:
- इंटरनेट असलेला स्मार्टफोन किंवा संगणक
- Chrome, Firefox सारखा वेब ब्राउझर
पायऱ्या:
- तुमच्या ब्राउझरमध्ये Google उघडा.
- “PMAY Awas Plus Report” असे टाइप करा.
- सरकारी वेबसाइटचा दुवा उघडा – https://pmayg.nic.in
- मेनूमधून “AwaasSoft” हा पर्याय निवडा.
- पुढे “Reports” या टॅबवर क्लिक करा.
- “Awas+ Reports” किंवा “Awas Plus Category Wise Data Summary” या पर्यायावर क्लिक करा.
- खालील माहिती भरावी लागेल:
- राज्य: महाराष्ट्र
- जिल्हा: (उदा. पुणे)
- तालुका: (उदा. बारामती)
- ग्रामपंचायत: (तुमचं गाव)
- “Submit” बटणावर क्लिक करा.
यानंतर तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल. यामध्ये खालील तपशील असतात:
- नाव
- जिल्हा
- मंजुरी क्रमांक
- नोंदणी क्रमांक
- लाभार्थ्याची जात (SC, ST, इतर)
या योजनेचे फायदे
- घरबसल्या माहिती मिळते – कुठेही फिरण्याची गरज नाही.
- ऑनलाइन सेवा मोफत – कोणतेही शुल्क लागत नाही.
- वेळ वाचतो – सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही.
- माहिती पारदर्शक आणि अचूक – सर्व तपशील अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध.
महत्त्वाचे
- जर तुमचं नाव यादीत असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार पुढील कागदपत्रं तयार ठेवा.
- जर नाव नसल्यास, काळजी करू नका – पुढील यादीत समावेश होऊ शकतो.