गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा तेही मोबाईलवर

Mp land records : आजकाल जमिनीशी संबंधित अनेक कामं ऑनलाईन पद्धतीने सहजपणे केली जात आहेत. सातबारा उतारा, फेरफार, मिळकत दाखला यांसारख्या गोष्टी आता घरबसल्या उपलब्ध आहेत. हे शक्य झाले आहे राज्याच्या महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या प्रयत्नांमुळे. त्याचप्रमाणे, आता तुम्ही तुमच्या शेतजमिनीचा नकाशा सुद्धा मोबाईलवर पाहू शकता.

शेतजमिनीचा नकाशा उपयुक्त ठरतो:

  • जमिनीची अचूक हद्द समजून घेण्यासाठी
  • शेतात जाणाऱ्या रस्त्याचा मागोवा घेण्यासाठी
  • शेजारील गटांची माहिती मिळवण्यासाठी

. अधिकृत वेबसाईट

mahabhunakasha.mahabhumi

लोकेशन व जिल्हा निवडा:

  • डावीकडील तीन रेषांवर क्लिक करा
  • “Location” कॉलममध्ये तुमचं राज्य, गट निवडा (Rural/Urban)
  • नंतर जिल्हा → तालुका → गाव निवडा

. व्हिलेज मॅप निवडा:

  • सर्व पर्याय भरल्यावर “Village Map” या पर्यायावर क्लिक करा
  • तुमच्या गावाचा नकाशा स्क्रीनवर दिसेल

गट नकाशा पाहण्यासाठी:

  • “Search Plot Number” पर्यायावर क्लिक करा
  • तुमच्या सातबाऱ्यावर असलेला गट क्रमांक टाका
  • संबंधित गटाचा नकाशा स्क्रीनवर दिसेल

नकाशावरून मिळणारी माहिती:

  1. प्लॉटवर क्लिक केल्यास त्या शेतकऱ्याचं नाव, किती एकर आहे, त्या प्लॉटची मर्यादा इ. माहिती मिळते
  2. “Plot Info” या पर्यायाखाली अधिक माहिती दिलेली असते
  3. डावीकडील (+) आणि (-) बटनाने नकाशा झूम इन/आउट करू शकता
  4. “Home” पर्यायाशेजारील बाणावर क्लिक करून फुल स्क्रीन मोड वापरा
  5. “Map Report” वर क्लिक केल्यावर पूर्ण माहितीचा रिपोर्ट मिळतो
  6. उजव्या कोपऱ्यातील बाणावर क्लिक करून तुम्ही नकाशा डाउनलोड करू शकता

तुमच्या मोबाईलचा उपयोग करून घरबसल्या तुम्ही शेतजमिनीचा नकाशा सहज पाहू शकता. यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये वेळ वाया घालवण्याची गरज उरत नाही. शेतकरी बांधवांसाठी ही पद्धत सुलभ, वेळ-बचत करणारी आणि विश्वासार्ह आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment