विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, शाळांच्या वेळापत्रकात बदल; नवीन वेळापत्रक पहा.Maharashtra School Timetable 2025

Maharashtra School Timetable news 2025 : राज्यातील शाळांच्या वेळाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळांचे वेळापत्रक बदलणार आहे. शाळा आता ७ ऐवजी ९ वाजता भरणार असून ४ वाजता सुटणार आहेत.

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शाळा येत्या १६ जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळा सुरू होण्यापूर्वी तयारी सुरू केली आहे.

शाळेसाठी नवीन दप्तर, वॉटर बॉटल, वह्या, पुस्तक खरेदी करणं सध्या सुरू आहे. अशातच शाळांच्या वेळापत्रकाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांचे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता शाळा सकाळी सात ऐवजी ९ वाजता सुरू होणार आहे.

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची सुरूवात येत्या १६ जूनपासून होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील शाळा सकाळी ७ ऐवजी ९ वाजता भरतील आणि सायंकाळी ४ वाजता सुटतील. म्हणजेच सकाळी ९ ते सायंकाळी ४ ही शाळेची वेळ असणार आहे.

शाळांच्या नव्या वेळापत्रकानुसार, सकाळी ९ वाजल्यापासून ते ९.२५ पर्यंत परिपाठ राहिल. ९.२५ ते ११.२४ पर्यंत सुरूवातीचे ३ लेक्चर होतील. ११.२५ पासून ते ११.३५ पर्यंत १० मिनिटांची छोटी सुट्टी असेल. ११.३५ ते १२.५० पर्यंत दोन लेक्चर होतील. १२.५० ते १.३० वाजेपर्यंत मधली सुट्टी होईल. त्यानंतर १.३० ते ३.५५ वाजेपर्यंत उर्वरित लेक्चर होतील. त्यानंतर शेवटच्या ५ मिनिटांमध्ये वंदे मारतम होईल आणि शाळा सुटतील.

दरम्यान, राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार आहे. उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या असून आता लवकरच शाळा सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहे.

तर सीबीएसई बोर्डाची शाळा येत्या ९ जूनपासून सुरू होणार आहे. राज्यातील ११ जिल्हे वगळता सगळीकडे शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भामध्ये इतर विभागांच्या तुलनेत थोड्या उशिराने शाळा सुरू केल्या जातात

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment