कल्याण-डोंबिवली महापालिकेत 490 पदांची भरती; 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी संधी

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे (KDMC) गट ‘क’ आणि ‘ड’ पदासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2025 आहे.

भरती करणारी संस्था: कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)
एकूण पदसंख्या: 490
भरती गट: गट ‘क’ व गट ‘ड’
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 3 जुलै 2025
अधिकृत संकेतस्थळ: kdmc.gov.in

📋 रिक्त पदांची यादी व शैक्षणिक पात्रता:

अनुक्रमांकपदाचे नावजागाशैक्षणिक पात्रता
1फिजिओथेरपिस्ट02MPTH + 2 वर्षे अनुभव
2औषधनिर्माता14B.Pharm + 2 वर्षे अनुभव
3कुष्ठरोग तंत्रज्ञ0312वी + लेप्रसी टेक्निशियन कोर्स + 2 वर्षे अनुभव
4स्टाफ नर्स78B.Sc (नर्सिंग) किंवा 12वी + GNM + 2 वर्षे अनुभव
5क्ष-किरण तंत्रज्ञ06B.Sc (Physics) + रेडिओग्राफी डिप्लोमा + 2 वर्षे अनुभव
6हेल्थ व्हिजीटर व लेप्रसी टेक्निशियन0110वी + लेप्रसी टेक्निशियन कोर्स
7मानसोपचार समुपदेशक02MA (Clinical/Counseling Psychology) + 2 वर्षे अनुभव
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ01B.Sc + DMLT + 2 वर्षे अनुभव
9लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक06B.Com + 3 वर्षे अनुभव
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)58स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
11कनिष्ठ अभियंता (विद्युत)12विद्युत अभियांत्रिकी पदवी
12कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)08यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
13चालक-यंत्रचालक1210वी + अग्निशमन कोर्स + 3 वर्षे अनुभव + ड्रायव्हिंग लायसन्स
14अग्निशामक (फायरमन)13810वी + 6 महिने अग्निशमन कोर्स
15कनिष्ठ विधी अधिकारी02विधी पदवी + 3 वर्षे अनुभव
16क्रीडा पर्यवेक्षक01पदवी + BPEd + SAI डिप्लोमा + 3 वर्षे अनुभव
17उद्यान अधिक्षक02B.Sc (Horticulture) / कृषी / बॉटनी / फॉरेस्ट्री + 3 वर्षे अनुभव
18उद्यान निरीक्षक11B.Sc (Horticulture) / कृषी / बॉटनी / फॉरेस्ट्री
19लिपिक-टंकलेखक116पदवी + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. + इंग्रजी 40 श.प्र.मि.
20लेखा लिपिक16B.Com + वरील प्रमाणे टायपिंग
21आया (महिला अटेंडंट)0210वी + 50 खाटांची रुग्णालयात 2 वर्षे अनुभव

💰 परीक्षा शुल्क:

  • सामान्य प्रवर्ग: ₹1000/-
  • मागास/अनाथ प्रवर्ग: ₹900/-
  • माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक: शुल्क माफ

वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी):

  • सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
  • मागास/अनाथ उमेदवारांना: 5 वर्षे वयोमर्यादेत सवलत

💵 वेतनश्रेणी:

  • ₹15,000/- ते ₹1,22,800/- पर्यंत (पदावर अवलंबून)

निवड प्रक्रिया:

  • उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे होणार आहे.
  • सामान्य प्रवर्गासाठी: किमान 50% गुण आवश्यक
  • मागास प्रवर्गासाठी: किमान 45% गुण आवश्यक
  • Normalization पद्धत लागू केली जाणार आहे.
  • गुणवत्तेनुसार अंतिम यादी KDMC च्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

🧾 महत्त्वाचे दुवे:

☎️ संपर्क:

  • तांत्रिक अडचणींसाठी: TCS हेल्पलाईन – 022-61087519
  • इतर प्रश्नांसाठी: 0251-2303060 (सोम – शनि, सकाळी 10 ते संध्याकाळी 6)
  • ईमेल: kdmcrecruitment2025@gmail.com

ह्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी समस्त अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा व KDMC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment