बांधकाम कामगार योजनेअंतर्गत गृहपयोगी वस्तू संच वाटप बंद शासन निर्णय पहा 2025

Bandhkam Kamgar Yojana Bhandi Vatap 2025 : महाराष्ट्र राज्यातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये मुख्यतः कुटुंबासाठी भांडी संच, गृहपयोगी वस्तू, अपघाती विमा, आरोग्य विमा योजना, मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत अशा अनेक योजनांचा समावेश आहे.

महत्त्वाची अपडेट – गृहपयोगी वस्तू संच वाटप थांबवले

राज्यातील बांधकाम कामगारांमध्ये सर्वाधिक मागणी असलेली योजना म्हणजे गृहपयोगी वस्तू संच वाटप. मात्र, 4 जून 2025 रोजी शासनातर्फे नवीन निर्णय घेण्यात आला असून, सदर योजनेअंतर्गत गृहपयोगी वस्तूंचे वाटप सध्या बंद ठेवण्यात आले आहे.

शासन निर्णयाचे मुख्य मुद्दे:

  • सद्यस्थितीत योजना थांबवण्याचे कारण म्हणजे संच वाटपासाठी वापरण्यात येणाऱ्या संकेतस्थळामध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचे काम सुरू आहे.
  • हे संकेतस्थळ अद्ययावत होईपर्यंत वस्तू संच वाटपाची प्रक्रिया 4 जून 2025 पासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
  • संकेतस्थळाचे काम पूर्ण झाल्यानंतर योजना पुन्हा सुरू करण्यात येईल, आणि याबाबत संबंधितांना सूचना देण्यात येणार आहे.

याआधीचे मार्गदर्शन:

उद्योग, ऊर्जा, खनिज व कामगार विभागाच्या 12 जुलै 2024 च्या पत्रानुसार, तालुका स्तरावर शिबिरे घेऊन बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे संच वितरित करण्याचे आदेश देण्यात आले होते. याची अंमलबजावणी देखील करण्यात आली होती.

कोण दिली ही अधिकृत माहिती?

हा शासन निर्णय श्री. विवेक कुंभार, सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांनी अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे.

सध्या गृहपयोगी वस्तूंच्या संचाचे वाटप थांबवण्यात आले असले तरी, हे फक्त तांत्रिक कारणास्तव आहे. संकेतस्थळातील सुधारणा पूर्ण झाल्यानंतर ही योजना पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. लवकरच नवीन अपडेट जाहीर करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment