बांधकाम कामगारांसाठी खुशखबर! पेन्शन योजनेत दरवर्षी ₹12,000 थेट खात्यात जमा

Bandhkam Kamgar pension scheme for construction workers list : राज्यातील लाखो बांधकाम कामगार आपल्या कष्टाने शहरे उभारतात, परंतु निवृत्तीनंतर त्यांचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुसह्य राहावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळामार्फत नवीन पेन्शन योजना राबवली जाणार आहे. या योजनेंतर्गत पात्र कामगारांना दरवर्षी १२,००० रुपये (महिन्याला १,००० रुपये) पेन्शन स्वरूपात दिली जाणार आहे. ही योजना लवकरच लागू होण्याच्या प्रक्रियेत आहे.

ही योजना कोणासाठी आहे?

  • महाराष्ट्र भवन व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगार या योजनेचे लाभार्थी असतील.
  • सध्या ३७ लाख नोंदणीकृत कामगार राज्यात आहेत.
  • अजून १६ लाख कामगारांचे नूतनीकरण प्रक्रिया प्रलंबित आहे.

अर्ज कसा करायचा?

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल.
  • अर्ज प्रक्रिया एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे पारदर्शकतेने राबवली जाणार आहे.
  • अर्ज स्वीकृत झाल्यानंतर संबंधित कामगाराला “पेन्शन नंबर प्रमाणपत्र” दिलं जाईल.
  • याच प्रमाणपत्रावर दिलेल्या दिनांकापासून पेन्शन सुरू केली जाईल.

पेन्शन मृत्यूनंतरही थांबणार नाही!

  • पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास, त्यांचा जीवनसाथी (पत्नी/पती) हयात असल्यास, तो पेन्शन घेण्यास पात्र राहील.
  • मात्र, जर जीवनसाथी आधीपासूनच पेन्शन घेत असेल, तर दुहेरी लाभ दिला जाणार नाही.

दरवर्षी “Life Certificate” आवश्यक

  • पेन्शन सुरू ठेवण्यासाठी, दरवर्षी जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करणे बंधनकारक आहे.
  • बँक खाते बदलायचं असल्यास किंवा वारस नोंदवायचा असल्यास त्यासाठीही स्वतंत्र प्रक्रिया उपलब्ध असेल.

६० वर्षांवरील कामगारांसाठी दिलासा

  • सध्या ६० वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना नूतनीकरणाची परवानगी नसल्याने, त्यांना इतर योजनांचा लाभ मिळत नाही.
  • ही नवीन पेन्शन योजना ६० वर्षांवरील कामगारांसाठीही दिलासादायक ठरणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे संक्षेपात

घटकमाहिती
योजना राबवणारा विभागमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
लाभार्थीनोंदणीकृत बांधकाम कामगार
पेन्शन रक्कमवार्षिक ₹१२,००० (मासिक ₹१,०००)
अर्ज प्रक्रियाऑनलाईन प्रणालीद्वारे
पेन्शन मृत्यूनंतरजीवनसाथी पात्र असेल तर लाभ सुरु
दरवर्षी पुरावाजीवन प्रमाणपत्र आवश्यक

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment