नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025 – पगार ₹25,500 ते ₹81,100, ऑनलाईन अर्ज सुरू!

DTP Maharashtra Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामार्फत एकूण 154 रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती राज्य सरकारच्या मान्यतेने होत असून, इच्छुक उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.

पदांची माहिती:

  • कनिष्ठ आरेखक (Group-C)
  • अनुरेखक (Group-C)

शैक्षणिक पात्रता:

  • किमान १०वी उत्तीर्ण
  • त्यासोबत स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्रात दोन वर्षांचा आरेखक पदवी / प्रमाणपत्र कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे.
    (अधिक तपशिलासाठी कृपया अधिकृत जाहिरात वाचा)

वेतनश्रेणी:

₹21,700/- ते ₹81,900/- (सरकारी नियमानुसार वेतन देण्यात येईल)

वयोमर्यादा (01 जुलै 2025 अनुसार):

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 38 वर्षे
    (आरक्षण प्रवर्गानुसार सूट लागू)

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण महाराष्ट्रभर

नोकरीचा प्रकार:

कायमस्वरूपी (Permanent Job)

अर्ज करण्याची पद्धत:

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या:

PDF जाहिरात 01

PDF जाहिरात 02

🧾 अर्ज शुल्क:

  • सर्वसाधारण प्रवर्ग (Open Category): ₹1,000/-
  • राखीव प्रवर्ग (Reserved Category): ₹900/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख:

20 जुलै 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत

महत्त्वाची टीप:

भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती, पात्रता, कर्तव्य व जबाबदाऱ्या, निवड प्रक्रिया आणि इतर अटी-शर्ती संबंधित अधिकृत PDF जाहिरातीत दिलेल्या आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment