Ashadhi Ekadashi 2025: तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन २०२५ करीतामानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रती दिंडी रु.२०,०००/- इतके अनुदान देण्यासाठी प्रशासकीय
तत्कालीन मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि. १४ जून, २०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीत तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन २०२४ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला रु.२०,०००/- इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत निदेश दिले आहेत. या संदर्भात आदर्श मानके निश्चित करण्यासाठी (Standard Operating Procedure) नगर विकास विभागाने दि.२२ जून, २०२४ रोजीच्या आदेशान्वये विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली असून सदर समितीने अहवाल सादर केला होता. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी सन २०२५ मध्ये तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन २०२५ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या ११०९ दिंड्यांना प्रती दिंडी रु.२०,०००/- इतके अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन २०२४ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला रु.२०,०००/- इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत संदर्भाधीन क्र. ५ येथील दि.०१.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. सन २०२३-२४ मध्ये विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडून एकूण ११०९ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. त्यानुसार गतवर्षीप्रमाणे याही वर्षी सन २०२५ मध्ये तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन २०२५ करिता मानाच्या १० पालख्यांसोबतच्या ११०९ दिंड्यांना प्रती दिंडी रु.२०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्त) याप्रमाणे एकूण रु.२,२१,८०,०००/- (अक्षरी रुपये दोन कोटी एकवीस लाख ऐंशी हजार फक्त) इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त, पुणे यांनी गेल्यावर्षीप्रमाणे मानाच्या १० पालख्यांसोबतच्या ११०९
दिंड्यांना प्रती दिंडी रु.२०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्त) इतके अनुदान वितरीत करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
३. दिंडी प्रमुखांच्या खात्यावर निधी जमा करण्याच्या कार्यवाहीसाठी आभासी वैयक्तिक ठेव लेखा VPDAप्रणालीस सूट देण्यात येत आहे. एम.टी.आर.३१ वर देयके सादर करण्यास व शासन निर्णय दि.१७.४.२०१५ मध्ये नमूद मर्यादेपेक्षा जास्त खर्च करण्यास तसेच देयकांसोबत उपप्रमाणाऐवजी ११०९ दिंड्यांच्या यादीवर Pass for payment करुन देयके कोषागारामध्ये सादर करण्यास याद्वारे विशेष बाब म्हणून मंजूरी देण्यात येत आहे.
४. एम.टी.आर.३१ वर देयके सादर करण्यास मंजूरी देण्यात आली असल्यामुळे दरपत्रकाची साक्षांकित प्रत जोडण्याची अट व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मान्यता घेण्याची तसेच देयकांसोबत जाहिरातीचा आकार विहित आकार दर्शविणारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे पत्र व तिसरी प्रत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास पाठविण्याची अट आणि देयकांसोबत उपप्रमाणाऐवजी या ११०९ लाभार्थ्यांच्या यादीवर Pass for payment करुन देयके कोषागारामध्ये सादर करण्यास याद्वारे विशेष बाब म्हणून मंजूरी देण्यात आली असल्याने सदर लाभार्थ्यांच्या यादीलाच उपप्रमाणक म्हणून ग्राह्य धरण्यास मंजूरी देण्यात येत आहे. सदर प्रकरणी जाहिराती संबंधीत उपरोक्त सर्व अटी शिथिल करण्यात येत आहेत
